“रक्तात आमच्या हरणंच नाही, हारून माघारी फिरणंच नाही,
नसलो आम्ही जरी सुपरहिरो,पण…. कर्तव्यापासून मागं सरणंच नाही…”
चौफेर न्यूज – थेरगांव सोशल फाऊंडेशनचा कालचा ५४ दिवस नेहमी प्रमाणे रोजच्या जेवणाची तयारी साधारणपणे ३:३० ला सुरु होते आणि ७:३० ला जेवण तयार होते,परंतु काल अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे #TSF समोर मोठा प्रश्न उभा राहिला की या जेवणाचे नक्की करायचे काय आणि मग अशा भर पावसात फाऊंडेशनच्या सॅनिटायझर कक्षामध्ये जेवणाचे पॅकिंग सुरू झाले आणि
चार रिक्षाचा साहयाने पिंपरी चिंचवडमधील चार वेगवेगळ्या दिशेने रिक्षा पाठवल्या
१:- चिंचवडगाव ते नाशिक फाटा
२:-डांगे चौक ते जगताप डेअरी
३:-डांगे चौक ते भूमकर चौक वाकड चौक
४:-वाकड चौक ते विशालनगर कारण सध्या स्थलांतरित होणारे नागरिक हे मोठ्या प्रमाणे चालत घरची वाट धरत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे हे सर्व लोक रोडच्या बाजूला थांबून पाऊस थांबण्याची वाट बघत होती. अशा सर्व भागातील साधारण ४५० लोकांना जेवण दिले.आणि आपल्या नेहमीच्या ठिकाणी साधारणपणे ३०० लोकांना जेवण देण्यात आले.