चौफेर न्यूज – लाॅकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास करता यावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केलेल्या ‘ई कंटेन्ट’ पोर्टलवर गेल्या दोन महिन्यात शैक्षणिक साहित्याचा खजिना संग्रहीत झाला आहे. सर्व विद्याशाखांचे मिळून १० हजार पेक्षा जास्त पीपीटी, पीडीएफ फाईल्ससह प्राध्यापकांनी तयार केलेले व्हिडिओ एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. याचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. 

‘कोरोना’ मुळे राज्यातील व सर्व महाविद्यालय, विद्यापीठ बंद  झाले. स्थगीत केलेल्या परीक्षांचे काय होणार याची स्पष्टता राज्य सरकारकडून देण्यात आलेली नव्हती. अशा काळात विद्यार्थी गावाकडे गेल्याने त्यांना अभ्यासासाठी पुस्तकांची गरज असल्याने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांनीआठवड्यात ‘ई कंटेन्ट’ निर्मितीसाठी पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी  खास टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.  अनेक महाविद्यालयांनी आॅनलाईन वर्ग सुरू केले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना हे साहित्य उपयुक्त ठरत होते. 

गेल्या दोन महिन्यात पुणे विद्यापीठातील व संलग्न महाविद्यालयांमधील ९७१ प्राध्यापकांनी हे शैक्षणिक साहित्य पोर्टलसाठी उपलब्ध करून दिले आहे. आत्तापर्यंत १ लाखापेक्षा जास्त जणांनी या पोर्टलला भेट दिली असून, हजारो विद्यार्थ्यांनी फाईल, व्हिडिओ डाउनलोड करून घेतले आहेत. 

२६ ग्रंथपालांची टीम – विद्यापीठाच्या http://econtent.unipune.ac.in या लिंकवर साहित्य उपलब्ध करण्यासाठी २५ ग्रंथपालांची टीम तयार केली आहे. आंतर-विद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू अाहे. तर जयकर ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथपाल डॉ. संजय देसले हे या प्रकल्पाचे समन्वयक आहेत. २५ जणांना विषय वाटप केले आहेत. प्राध्यापकांच्या एका इमेलमध्ये बरेच साहित्य असते. त्यातील पीपीटी फाईल, व्हिडिओ, प्रश्नसंच यांचे वर्गीकरण करून ते पोर्टलवर अपलोड केले जाते. तसेच वेळोवेळी झूमद्वारे या ग्रंथपालांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या जातात. 

या पोर्टलमसाठी प्राध्यापकांनी यासाठी व्हिडिओ, पीपीटी, पीडीएफ नोट्स  लेक्चर्स, प्रोजेक्ट, प्रश्नसंच असे साहित्य पाठविले आहे. यामध्ये कला, वाणिज्य, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विज्ञान, स्पर्धा परीक्षा यांचे साहित्य अपलोड करण्यात आले आहे. यात विज्ञान व तंत्रज्ञान या विद्याशाखे साहित्य सर्वाधिक उपलब्ध झाले आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाने ‘ई पोर्टल’ सुरू केले. त्यात आतापर्यंत ९७१ प्राध्यापकांनी १० हजारपेक्षा जास्त साहित्य पाठविले आहे. या पोर्टलला भेट देणाऱ्यांचायी संख्या १ लाखाच्या पुढे गेली असून, वरील शैक्षणिक साहित्याचा विद्यार्थ्यांना उपयोग झाला आहे. यावर आणखी साहित्य आवश्यक असल्याने सर्व विद्याशाखेच्या प्राध्यापकांनी साहित्य पाठवावे.डॉ. संजय देसले, समन्वयक, पोर्टल, पुणे विद्यापीठ

विद्याशाखा – प्राप्त इमेल – पीपीटी/पीडीएफ- व्हिडिओ-प्रश्नसंच- एकुण साहित्य
वाणिज्य व्यवस्थापन- ६९३-१९४२-४४-१५-१९८३
मानवविज्ञान – १००७-२७७३-१२१-२१-२८६५
विज्ञान तंत्रज्ञान –४३३२-३५५१-९४९-३२
आंतर-विद्याशाखीय२१०-२३८-२८३-१२-५३३
स्पर्धा परीक्षा १८३-२१२-८०-४४-३३४
एकुण – ३५९३-८४४६-१४७७-१२४-१००४७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here