प्रचिती इंटरनॅशनल स्कुल व प्रचिती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला आनंद
चौफेर न्यूज – साक्री शहरातील सीबीएसई माध्यमातील ऑनलाईन शाळा बुधवारी (ता.3) जून पासून मोठ्या उत्साहात सुरु झालेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने देखील ऑनलाईन शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. शहरातील प्रचिती इंटरनॅशनल स्कुल व प्रचिती पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. वर्गामध्ये शिकविणाऱ्या टिचर चक्क मोबाईल आणि कॉम्प्यूटरच्या स्क्रिन च्या माध्यमातून संवाद साधत असल्याचे पाहताना विद्यार्थी काहीशी भांबावून गेले होते. पहिल्यांदाच ते एक वेगळा अनुभव घेत होते. शाळेच्या व्यवस्थापनाने अगोदरच सुचना दिल्याने पालक मुलांसह पूर्व तयारी केलेली होती. सकाळी अकरा ते दुपारी एक ही शाळेची वेळ आहे. काही उत्साही विद्यार्थी तर घरी देखील शाळेच्या गणवेश परीधान करुन ऑनलाईन वर्गात उपस्थित होते.
कमी कालावधीमध्ये शाळेच्या शिक्षिकांनी हे ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेले आहे हि उल्लेखणीय बाब आहे.