चौफेर न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. मात्र असं असलं तरी पुढील आदेश येईपर्यंत शाळा सुरू होणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनलॉक 1 मध्ये दिली होती. त्यामुळं यावर्षी शाळा सुरू होणार की ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायच निवडला जाणार याकडे राज्यातील पालकांचं लक्ष लागलेलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आता प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरु करण्यात येणार आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागासोबत बैठक पार पडली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील बैठकीत उपस्थित होत्या.

विद्यार्थी आणि पालक यांनाही शाळा सुरू होणार की ऑनलाइन पद्धतीनं शिक्षणाचे धडे मिळणार याबाबत कुतूहल निर्माण झालं होतं. मात्र कोरोनाचे संकट बघता पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंदच असणार असल्याचं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. 15 जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. शिक्षकांना शाळेत हजर राहण्याच्या आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी शाळेचा पहिला दिवस सुरु होत असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळांमध्ये हजेरी लावली. मात्र शिक्षण विभागाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शैक्षणिक कामकाज करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here