चौफेर न्यूज – लॉकडाउन शिथिल करत जनजीवन पूर्वपदावर आणल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने कंटेन्मेंट झोन’मध्येही वाढ होत आहे. शहरातील ‘कंटेन्मेंट’ झोन 21 वरुन 107 वर पोहोचले आहेत. आजमितीला शहराच्या 107 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या क्षेत्रातील निर्बध कडक असणार आहेत. परिसरातील नागरिकांवर विविध बंधने लादली आहेत.
रुग्ण वाढ होत असल्याने कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी एप्रिलमध्ये आठ दिवस संपूर्ण शहर ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधिक क्षेत्र) म्हणून घोषित केले होते. त्यानंतर रुग्ण वाढीचा दर कमी झाल्याने सक्रिय रुग्ण असलेली 21 ठिकाणेच कंटेन्मेंट’ झोन जाहीर केली होती. त्यानंतर ज्या भागात रुग्ण वाढतील तो भाग ‘कंटेन्मेंट’ झोन घोषित केला जात आहे. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय प्रभागाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
शहरातील 107 कंटेन्मेंट‘ झोन!
पिंपरीतील वल्लभनगर,आकाशनगर सोसायटी, शास्त्रीनगर, वैभवनगर रोड दोन, खराळवाडीतील साईसिद्धी अपार्टमेंट, भीमनगर, बौद्धनगर, गुरुदत्तनगर, नाणेकर चाळ, भाटनगर, सोनकर कॉम्पलॅक्स, सोनकर चेंबर्स, नेहरुनगरमधील नवजीवन सीएचएस, मोरवाडीतील सुखवानी इंमपेरियल, लालटोपीनगर, आकुर्डीतील दत्तनगर, रामनगर, आदर्श गृहनिर्माण सोसायटी, काळभोरनगर, प्राधिकरणातील आनंद पार्क, सेक्टर 27, दापोडीतील गुलाबनगर, न्यू गुलाबनगर, एसएमएस कॉलनी, शेवळे अपार्टमेंट, माने चाळ, कासारवाडीतील केशवनगर,
चिंचवडमधील बहिरवाडे कॉप्लॅक्स, शाहूनगर, सोनिगरा ओपेल, आपुलकी सीएचएस, रेणुका अपार्टमेंट दळवीनगर, बिजलीनगरमधील श्रीराम कॉलनी, केशवनगर, साईबाबानगर, किवळेतील एमबी कॅम्प, सिद्धीविनायक कॉलनी, रावेतमधील हॉलमार्क अव्हेन्यू, वाल्हेकरवाडीतील गुरुदत्त कॉलनी.
पिंपळेसौदागर येथील रोझ आयकॉन, कवडेनगर, गणेशम दोन, रॉयल एम्पेरिओ, दिव्या हाईट्स, पिंपळेगुरव मधील नेताजीनगर, रामकृष्ण चौक, सांगवीतील शिवांजली रोड, मधुबल लेन दोन, समतानगर, ममतानगर लेन दोन, जुनी सांगवीतील शिंदनगर, संगमानगर, साई स्नेहा पार्क, येस रेसिडन्सी संगमानगर, ढोरेनगर, उषकाल सीएचएस, पिंपळे निलखमधील शिक्षक सोसायटी.
भोसरीतील राधाकृष्णनगर, साई अपार्टमेंट गुरुविहार, खंडोबा माळ, दोन, बालाजीनगर, गीता सोसायटी, गवळीनगर, संत तुकारामनगर, चिखलीतील यशवंतनगर, पाटीलनगर, मोरेवस्ती, रेजेंट पार्क, गोकूळ सीएचएस,ओम साई सीएचएस, ईमनझेका पार्क, क्रिस्टल सिटी.
चिंचवडमधील इंदिरानगर, आनंदनगर, वाकडमधील सद्गुरु कॉलनी, माउली चौक कलाटेनगर, कमलाकर चौक, मानकर एम्पायर, बेला वेस्टा, ज्ञानप्रभा स्कूल, काळेवाडीतील विजयनगर, नढेनगर, सखीहरी बँक, ज्योतीबा नगर, रहाटणीतील शिवतिर्थनगर, थेरगावातील बेलटिकानगर,
निगडीतील महात्माफुले सोसायटी, साईकृपा सीएचएस, साईनाथनगर, निगडी रुपीनगरमधील कौतय सीएचएस, पंचदूर्गा सीएचएस, त्रिवेणीनगर, अजंठानगरमधील सिद्धार्थ बिल्डींग, यशोदा सीएचएस, थरमॅक्स चौक, चहोलीतील तनिष्क ऑर्केड, काटेनगर, फुलेनगर, वडमुखवाडी, दिघीतील बीयू भंडारी, बोपखेलमधील छत्रपती चौक हा भाग ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये आहे.
या परिसरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या परिसरातील नागरिकांवर विविध बंधने आहेत.