चौफेर न्यूज – वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडला. वादळाने रौद्र रुप धारण केल्याने जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणची झाडे उमळून मोडून पडली असून मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान केले असल्याने यामध्ये काही घरे जमीनदोस्त झाली तर काही घरांवरचे पत्रे – कौले पाहायला मिळाले. या वादळाचा मोठा फटका खालापूर तालुक्यातील नागनाथ उंबरविरा ठाकूरवाडी बसल्याने याठिकाणचे अनेक घरे जमीनदोस्त झाल्याने येथील ग्रामस्थांच्या घरावरील छप्परे उडून गेल्याने मोठ्या संकटात सापडले आहेत, येथील ग्रामस्थांना लोकप्रतिधीनी, प्रशासन यांनी सहकार्य करीत संकटातून सावरण्यासाठी धीर दिला असता अधिकाधिक मदत मिळावी म्हणून १४ जून रोजी थेरगाव सोशल फाऊंडेशनने लोकसहभागातून मदतीचा हात पुढे करीत महिनाभर पुरेल असे जीवनावश्यक साहित्य, मायेची उब मिळावी म्हणून चटई, अंगावर ब्लॉकेट – चादर या सर्व साहित्य देण्यात आले. यामध्ये फाऊंडेशन चे निलेश पिंगळे, अनिल घोडेकर, राहुल सरवदे, अनिकेत प्रभु, अंकुश कुदळे, बाळा दळवी, महेश येळवंडे, प्रसाद भेडसगावकर, संदिप येळवंडे, संदेश गोडांबे, सचिन क्षिरसागर, स्वप्निल मंडल यांनी सक्रीय सहभाग घेतला.