साक्री : रेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमूग शेंगा व मक्राची मोठी आवक सुरू झाली आहे. बाजार समितीत तालुक्रातील माळमाथा परिसर, धुळे, नंदुरबार, बागलाण रा परिसरातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणत आहेत.
शेतकर्रांनी बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी आणावा, असे बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, उपसभापती मंगला पाटील व संचालक मंडळाने आवाहन केले आहे. बाजार समितीत ओली शेंग 150 ते 260 क्विंटल, कोरडी शेंग 100 ते 150 क्विंटल इतकी आवक होत आहे. ओली शेंग तीन ते साडेतीन हजार रुपरे प्रती क्विंटल, कोरडी शेंग चार हजार 50 रुपरे ते चार हजार 800 रुपरे प्रती क्विंटल भाव आहे; तसेच मक्राची 300 ते 520 क्विंटल आवक होत असून, 850 ते एक हजार 150 रुपरे भाव मिळत आहे, अशी माहिती सचिव अशोक मोरे रांनी दिली.