चौफेर न्यूज – शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत काही शैक्षणिक संस्था व शाळांकडून जबरदस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी शाळांमध्ये कसे व कधी उपस्थित रहावे यासाठी शैक्षणिक संस्थांना व शाळांना शिक्षण विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महिला शिक्षक, मधुमेह, श्वसनाचे विकार असलेले, रक्तदाब, हृदयविकार आदी आजार असलेले व ज्यांचे वय ५५ वर्षावर आहे, अशा शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत बोलावू नये अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिका यांनी शाळा सुरु करण्याबाबत व शिक्षक उपस्थितीबाबत कोणत्याही सूचना देऊ नये, शाळा सुरु करण्याची तयारी आणि ई लर्निंगसाठी मुख्याध्यापकांनी आवश्यकता असल्यास शिक्षकांना आठवड्यातून दोन दिवस बोलावल्यास शिक्षकांनी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचेही या पत्रकातून सूचित करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध राहणार असल्याने शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षकांना वर्क प्रॉम होम करू देण्याची सवलत द्यावी,असे शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाईन शिक्षणप्रक्रियेत उपयोग करून घ्या एकाच दिवशी सर्वांना न बोलावता आठवड्यातून एक किंवा दोनच शिक्षकांना वालवावे, इतर आस्थापनेवर नियुक्ती करण्यात आलेल्या सरप्लस शिक्षकांना मूळ शाळेत बोलावून त्यांचा ऑनलाईन शिक्षणप्रक्रियेत उपयोग करून घ्यावा, त्याचप्रमाणे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरातीला शाळा मुख्याध्यापकाच्या ताब्यात येईपर्यंत तेथील कोणत्याही शिक्षकाला शाळेत बोलावून घेऊ असे स्पष्ट निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.

कोरोना डयुटीतून मुक्त करा कोरोना विरोधी लढ्यात शिक्षकांना रेशन दुकाने, चेक पोस्ट, कोरोना सर्वेक्षण अशा ठिकाणी काम देण्यात आले आहे. या शिक्षकांना आधी कोरोना सेवेतून मुक्त करावे तरच ते आनलाईन शिक्षण घेण्यासाठी पूर्णवेळ देऊ शकतील अशी मागणी शिक्षक करत आहेत. त्यामुळे शिक्षणाधिका यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना कार्यमुक्त करून घेण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here