चौफेर न्यूज – ऑनलाइन क्लास सुरू करत शिक्षण पूर्ण करण्याचा दावा शाळांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी याला योग्य ते सहकार्य करत नाहीत. पालक रडकुंडीला आले आहेत. सुरुवातीचे दोन दिवस अत्यंत प्रामाणिकपणे आणि मन लावून अभ्यासाला बसणारी मुले आता क्लास बंक करण्याचा बहाणा शोधत आहेत. त्यानुसार नेमकी या क्लासेसची स्थिती सध्या कशी आहे, याचा आढावा लोकमत’ने घेतला आहे.

आनलाइन शाळा भरत असल्याने मोबाइलवर शिक्षण घ्यावे लागत आहे. आनलाइन शिक्षण आणि प्रत्यक्ष शाळेतले शिक्षण यात खूप फरक आहे. शाळेत शिक्षक शिकवत असताना त्यांचे मुलांकडे बारकाईने लक्ष असते.आनलाइन शिक्षण घेताना तसे लक्ष राहत नाही. परंतु पर्याय नसल्याने आनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे थोडा तरी अभ्यास करायला मिळत आहे. अन्यथा अभ्यासाची सवय मोडून जाईल.

इंटरनेटचा कमी स्पीड आणि तुटक आवाज शाळेकडून ‘आनलाइन’ क्लास घेतला जात असला तरी इंटरनेटचा स्पीड योग्य नसल्याने किंवा नेटवर्क समस्येमुळे शिक्षकांचा आवाज ब्रेक किंवा तुटक येतो. त्यामुळे ते काय बोलत आहेत हेच समजत नाही. एखादा विषय समजून घेण्यात अडचणी येत आहेत. विशेषत: गणितासारखे विषय तर डोक्यावरूनच जात आहेत. अधिक स्पीडसाठी जास्त पैसे मोजून डेटा पॅक पालकांना घ्यावा लागत आहे. तसेच टेक्नोसॅव्ही नसलेल्या पालकांना तर लॉगिनपासून सगळ्याच गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे.

होमवर्क’ पीडीएफवर होमवर्क पाठवला जातो. तो पूर्ण करताना मोबाइल तासन् तास हातात घेऊन पालकांना बसावे लागते. सध्या तर मुलांचे डोळे खराब होतील या भीतीने पालक स्वत:च मोबाइलवर अभ्यास पूर्ण करून देत आहेत. व्हिडीओ आफ करून सुरू असतो डान्स’ मध्ये दहा मिनिटांचा ब्रेक देत सतत तीन तास मुलांना स्क्रीनवर खिळवून ठेवले जाते. त्यामुळे अनेकदा मुले व्हिडीओ आफ करून थोडा डान्स आणि स्ट्रेच करत पुन्हा क्लासला बसत आहेत. मात्र त्यानंतरही त्यांची स्थिती रेंगाळल्यासारखीच असते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात शाळा सुरूच करू नये असेही पालकांकडून सांगितले जात आहे.

आनलाइन शाळेत चाललाय अभ्यासाचा भडिमार महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून आदेश निघाल्यानंतर आनलाइन अभ्यासाचा मार्च महिन्यापासून महापूर आला आहे. मुलांची उन्हाळी सुट्टीही आनलाइन अभ्यासामध्ये गेली असल्याने शेवटी अतिरेक झाला की मुलांना कंटाळा येणार याचा अनुभव मुख्याध्यापक संघटना करत आहे, आणि यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहे.आनलाइन अभ्यासाला अनेक तांत्रिक, परिस्थितीनुरूप अडचणी येत आहेत, त्याबाबत कोणताही पर्याय अजून उपलब्ध केलेला नाही. इंटरनेटचा अतिरिक्त खर्चभार शिक्षकांवर येत आहे. आनलाइन शिक्षण हे आर्थिक बाबीकरिता सुरू केले आहे, असेच वाटते. कारण हे शिक्षण पूर्णपणे मोफत द्यावे, असा आदेश शासनाने काढणे आवश्यक होते. तसा कोठेही उल्लेख नाही. हे शिक्षण विभागाकडून लादलेले आहे. याचे अवडंबर माजवले जात आहे. आनलाइन शिक्षण हे मर्यादित हवे. त्याचा लाभ सर्वांना घेता येत नाही.शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा शिकवावे लागणार आहे.

ई-शैक्षणिक आहे साहित्याचा अभाव आनलाइन अध्यापनासाठी असेलेली खासगी अॅप्सची मांडणी मुलांना चटकन आवडेल अशी आकर्षक आहे. पूर्वीच्या शाब्दिक पाठांतराची जागा आता दृश्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, कृतीतून शिक्षण देणा या साहित्याचा अभाव सध्याच्या ईशैक्षणिक साहित्यात मोठ्या प्रमाणावर दिसतो. स्थानिक भाषांमधील, विद्यार्थ्यांचे राहणीमान, संस्कृती आणि अनुषंगिक भावविश्व याला समर्पक साहित्याची उपलब्धता नसणे हा अजून एक प्रश्न आहे. शालेय स्तरावर आनलाइन शिक्षणाचा आग्रह करताना त्याच्या सद्यस्थितीकडे सजगपणे पाहिले नाही तर शिक्षण खरच आभासी’च राहील. आनलाइनखेरीज अन्य पर्यायांचा विचार व्हावा.

आनलाइन शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना जे कार्यक्रम दिले जातात त्यांचा दर्जा अत्यंत चांगला असणे गरजेचे आहे. मुले जेव्हा आनलाइन शिक्षण घेत असतील तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय शिक्षण मसुद्यामध्येही सहा वर्षांवरील विद्यार्थ्यांना मोबाइल वापर | करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र किती काळ त्याचा वापर करायचा याचे नियंत्रण पालकांनी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या नवीन | पिढीला मोबाइल व इतर गॅझेटला वगळून पुढे जाता येणे शक्य नाही. त्यामुळे या सर्व बाबींची दखल घेऊन नियंत्रित पध्दतीने आनलाइन पद्धतीचा अवलंब करता येऊ शकेल.

आनलाइन शिक्षण हा आजच्या अभ्यासासाठी केवळ एक पर्याय म्हणून पाहण्याची गरज आहे. शिक्षकांना पूर्ण प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ते कोणत्याही शिक्षकांना नाही. विद्यार्थ्यांची सायबर सिक्युरिटीही सगळ्यात महत्त्वाची प्राथमिकता आहे. मात्र विद्यार्थी व शिक्षकांना याचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न दिल्याने त्यांच्या सुरक्षिततेला मोठा धोका आहे. विद्यार्थी एकमेकांचे मेल आयडी आणि लिंक एकमेकांना शेअर करून शिक्षकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या अभ्यासाच्या स्क्रीनवर विविध इमोजी व स्टिकर्स पाठवून फेक अटेंड्सही लावण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाने शिक्षकांच्या आणि पालकांनी मुलांच्या सायबर सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी.अनेक शिक्षक वर्क फ्रॉम होम करत असताना नेटवर्क व इंटरनेटच्या खूप समस्यांना समोरे जावे लागत आहे.

शेजारी, त्यांची मुलेही डोकावतात स्क्रीनमध्ये.  मुलांना आनलाइन शिक्षणादरम्यान एकांत मिळेल अशा ठिकाणी बसवण्याचा सल्ला शाळेने दिला आहे. जी मुले चाळीत लहान खोल्यांमध्ये

राहतात त्यांना घरात शांतता मिळतच नसल्याचे पाहायला मिळत आहे. ब याचदा तर शेजारी व त्यांची लहान मुले मोबाइल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये डोकावत असल्याचेही प्रकार घडत आहेत. परिणामकारक नाही प्रत्यक्ष वर्गात शिकण्याएवढी परिणामकारकता या आभासी वर्गामध्ये अर्थातच नाही. वर्गातील वातावरण नियंत्रित असते तेथे मुलांचे लक्ष खिळवून ठेवणे जेवढे शक्य होते तेवढे अनियंत्रित आभासी वर्गामध्ये शक्य नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या शिक्षण व्यवस्थेने डिजिटल शिक्षणासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, त्यानंतर हे पर्याय स्वीकारले पाहिजेत

मोबाइल नोटिफिकेशन वाचण्यात होतोय टाइमपास’! ‘आनलाइन’ क्लासचे कौतुक सुरुवातीचे दोन दिवस मुलांनी केले असले तरी त्यानंतर मात्र घरात समोर लॅपटॉप, मॉनिटर किंवा मोबाइल घेऊन बसायचे आणि कानाला हेडफोन लावून शिक्षकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यात फारसा रस नसल्याचे दृष्टीस पडत आहे. अधूनमधून मोबाइलमध्ये फेसबुक, ट्विट अथवा इन्स्टाग्रामवर आलेले मेसेज किंवा व्हिडीओचे नोटिफिकेशनही मुले पाहत बसतात. शिकवण्याकडे त्यांचे लक्ष राहत नाही. मूल अभ्यासच करतंय की आणखी काही अशी दुगदुग पालकांच्या मनाला सतत असल्याने काम बाजूला ठेवून क्लास संपेपर्यंत सतत मुलांसोबतच राहावे लागतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here