चौफेर न्यूज –: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आज दिनांक १ जुलै रोजी पिंपरी चिंचवड महापालिका भवनात महापौर सौ उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सह शहर अभियंता रामदास तांबे, सहा. आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदि उपस्थित होते.