चौफेर न्यूज – सर्व शिक्षण संस्थांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. या माध्यमातून इयात्ता तीसरी ते दहावी व बारावीच्या वर्गासाठी वेळेचे नियोजन करून ठराविक तासिंकाच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली नाशिक जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरु होऊ शकलेली नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्थांनी ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६०टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात ऑनलाईन

शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे. या माध्यमातून इयात्ता तीसरी ते दहावी व बारावीच्या वर्गासाठी वेळेचे नियोजन करून ठराविक तासिकाच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षणातही ऑनलाईन अध्यापनास सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे, मोबाईल, इंटरनेट अभावी अथवा अन्य समस्यांमुळे ऑनलाईन तासिकेत सहभागी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे कमी वेळाचे वेगवेगळे व्हीडियो व्हॉट्सअपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात असून अशा प्रकारे जिल्ह्यातील जवळपास ६० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आता ऑनलाईन शिक्षणाची गंगा पोहोचली असून या विद्यार्थ्यांनी आतापासूनच भविष्यातील डिजिटल युगात प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here