चौफेर न्यूज – शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हाभरातून विद्यार्थी, शिक्षक येणार असून तेथे सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सॅनिटायझर, स्वच्छतेबाबत शालेय समित्या, संस्थापकांनी मौन पाळले आहे. यामुळे शाळेत येण्याबाबत शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे.

शाळा, महाविद्यालयांमध्ये जिल्हाभरातून विद्यार्थी, शिक्षक येणार असून तेथे सोशल डिस्टन्सिंग कसे ठेवणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य शासनाने नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग दि.१ जुलैपासून सुरू करण्याची परवानगी देऊन पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी शालेय समित्यांवर टाकली आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या जिल्ह्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती आहे. गंभीर परिस्थिती असताना शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासन आणि विद्यापीठाने ताठर भूमिका घेणे चुकीचे आहे, असग शिक्षक संघटनांचे मत आहे. राज्यात एकाही विद्यापीठाने महाविद्यालये चालू करण्याची भूमिका घेतलेली नाही. केवळ शिवाजी विद्यापीठाने सर्वच प्राध्यापकांना महाविद्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे. काही महाविद्यालयांमध्ये अध्यापकवर्ग शंभरावर आहे. तेथे सोशल डिस्टन्सिंगच्या पालनाचा प्रश्न आहे. स्टाफरुमही छोट्या आहेत. स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्ती आणि स्वच्छता नाही. सॅनिटयझर, हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी उपलब्धता नाही. प्राध्यापक, विद्यार्थी अनेक गावांमधून महाविद्यालयात येणार आहेत. यापैकी एखादा जर पॉझिटिव्ह असेल तर किती व्यक्तींना त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे, यासह अनेक प्रश्न प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये उपस्थित होत आहेत.

हीच परिस्थिती माध्यमिक, प्राथमिक शाळांमध्येही आहे. येथील शिक्षकांनीही कोरोनाची भीती संपेपर्यंत शाळा सुरू करू नयेत, अशीच भूमिका घेतली आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांनीही शासनाकडे दि.१ नोव्हेंबरपासूनच शाळा सुरू करावी, सॅनिटायझर आणि अन्य सुविधांसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here