चौफेर न्यूज – कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे सीबीएसई दहावीचा निकाल नियोजीत वेळेत लागणार नसल्याची चर्चा असतानाच सीबीएसई दहावीचा निकाल उद्या (दि.15) जाहीर होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्यांच्या या ट्विटरवरील घोषणेने सीबीएसई दहावीचा निकाल कधी लागणार याविषयीची प्रतीक्षा संपली आहे.
सीबीएसईचा बारावीचा निकाल सोमवारी (दि.14) जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी उत्सुकता होती. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे 15 जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित होते.
त्यामुळेच कालपासून दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या. सीबीएसईचा दहावीचा निकालाची तारीख स्वतः केंद्रीय मंत्र्यांनीच जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना उद्या निकाल हातात पडण्याची प्रतीक्षा आहे.