चौफेर न्यूज
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून 1 ऑगस्टपासून प्रवेश अर्ज ऑनलाइन स्वरुपात https://admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहेत. हे फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध राहणार आहेत. यंदा राज्यातील शासकीय व खासगी अशा 986 संस्थांमध्ये 1 लाख 45 हजार जागा उपलब्ध आहेत.
राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट 2020 सत्रातील प्रवेशासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशोच्छुक उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करुनच ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करावा, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खास यूट्यूबर व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. अर्ज भरण्यापूर्वी https://youtu.be/vovdvvamlyY या लिंकवरून जाऊन व्हिडीओ पहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशासासाठी चार फेऱ्या
अर्ज भरल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी 18 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी पहीली प्रवेश फेरी, 21 ऑगस्ट रोजी दुसरी, 3 सप्टेंबर रोजी 3 री तर 8 सप्टेंबरला 4थी आणि शेवटची फेरी जाहीर होणार आहे. या काळात विद्यर्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित करायचे आहेत.
राज्यातील आयटीआयची संख्या – 986
सरकारी आयटीआय संख्या – 468
खासगी आयटीआय संख्या – 569
क्षमता
सरकारी संस्था – 92, 472
खासगी संस्था – 53160
एकूण – 145632
ट्रेड संख्या
79 सरकारी संस्था
52 खासगी संस्था