चौफेर न्यूज – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी आज रशियाला कोरोना लसीची निर्मिती करण्यात यश आल्याचा दावा केला. याचबरोबर रशिया हा जगातील मानवावर प्रत्यक्षात वापर करता येईल अशी कोरोना लस निर्माण करणारा पहिला देश ठरला आहे. याबाबतची माहिती पुतीन यांनी एका सरकारी बैठकीदरम्यान दिली.

रशियाने तयार केलेली ही लस घेणं नागरिकांसाठी बंधनकारक करण्यात आलं नसून ऑक्टोबर महिन्यात व्यापक लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात येणार आहे. असं असलं तरी रशियातील डॉक्टर्स, शिक्षक व इतर फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना ही लस सर्वप्रथम देण्यात येईल.

रशियाने तयार केलेल्या लसीबाबत बोलताना पुतीन यांनी, ‘ही लस पूर्णपणे सुरक्षित असून ती सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी झाली आहे. या लसीचे दोन डोस माझ्या मुलीला देण्यात आले असून तिची प्रकृती ठणठणीत आहे.’ अशी माहिती दिली.

गामालेई संसर्गजन्य रोग आणि सूक्ष्मजीवशास्त्र संशोधन संस्थेने ही लस बनवली असून सेशेनोव्ह विद्यापीठात 18 जूनपासून मानवी चाचण्यांना सुरुवात करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here