चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रशासनाने नियोजित केलेल्या आराखड्याप्रमाणे 15 ऑगस्ट 2020 स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.
संपूर्ण जग हे करोना नामक विषाणूच्या विळख्यात अडकल्यावर संपूर्ण मानव जातीला निसर्गाचे व स्वच्छतेचे महत्त्व पटवून आले.
करोना विषाणू पासून आपल्याला वाचवण्याचे काम डॉक्टर,पोलीस,सफाई कामगार व प्रशासन करत आहे.त्यामुळे शाळेत गेल्या दहा वर्षापासून शाळेत शिपाई या पदावर काम करत संपूर्ण शाळेची स्वच्छता टिकवून ठेवणारे श्री दीपक देसले व वैशाली भामरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या मंगल प्रसंगी शाळेच्या सहशिक्षिका सौ नितु पंजाबी तसेच श्वेता सोनवणे व शाळेचे लिपिक श्री बंदिश खैरनार हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
स्वतंत्र दिनाच्या या मंगल समयी चेअरमन,प्राचार्या,व्यवस्थापक व सर्व शिक्षकांनी कमीत कमी एक मीटर अंतर ठेवून करोना विषाणूच्या प्रादुर्भाव होण्यापासून प्रयत्न केले.त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाला घरी राहून स्वतःला सुरक्षित राहून संपूर्ण देशाला वाचवण्याचा अनमोल संदेश देणारे एक नाट्य व गीत सादर केले.
शाळेत संपूर्ण शिक्षकांनी ध्वज गीत गाऊन आपण स्वतंत्र भारतात असल्याचा अभिमान वाढविला या मंगल प्रसंगी सहशिक्षिका वृषाली सोनवणे व वैष्णवी थोरात यांनी आत्मनिर्भर भारत व करोना पासून मुक्ती देणारा संदेश असलेली रांगोळी व फलक लेखन केले. ध्वजारोहणाच्या वेळेस विद्यार्थ्यांसाठी शाळेने एक ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते.
१)चित्रभरण स्पर्धा
२) ऑनलाइन भाषण स्पर्धा
यात अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला शाळेतील सहशिक्षक गावित सर व सहशिक्षिका वैशाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शाळेच्या प्राचार्या आपल्या मनोगतातून विध्यार्थ्यांना स्वतःच्या स्वावलंबनातून खऱ्या अर्थाने स्वतंत्र होण्याचा संदेश दिला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संदीप देवरे यांनी केले.संपूर्ण स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास शाळेचे चेअरमन मा.श्री.प्रशांत भीमराव पाटील सर प्राचार्या भारती पंजाबी व्यवस्थापक श्री.तुषार देवरे श्री. वैभव सोनवणे उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री. कुणाल देवरे व सौ.वैष्णवी देवरे यांनी केले.