प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज साक्री येथे Online शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

चौफेर न्यूज – ज्यांच्या ज्ञानामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो आणि आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होते ते म्हणजे शिक्षक. शिक्षकां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिनांक 5 सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज साक्री येथे Online शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारती पंजाबी समन्वयक श्री तुषार देवरे व श्री वैभव सोनवणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 कार्यक्रमात सर्वप्रथम अध्यक्षस्थान दिल्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार पुष्प वाहून पूजा करण्यात आली.

त्यानंतर 5 सप्टेंबर रोजीच आपण शिक्षक दिवस का साजरा करतो?  याचे प्रास्ताविक करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Online कार्यक्रम प्रसारित करून विद्यार्थ्यांचे Online Speeches घेण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे 3 गटात विभाजन केले होते.

त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

1 गार्गी धनंजय सोनवणे

2 हिमानी रोहिदास सूर्यवंशी

3 प्राप्ती किरण वाघ

4  कन्हैयालाल भामरे

5 वेदिका राहुल पाटील

6 हार्दिक कुवर

7 सर्वेश राकेश खैरनार

8 अवनी राहुल पवार

9 समृद्धी देवरे

10 ध्रुव बच्छाव

11 निखिल काकुस्ते

12 पल्लवी वाघ

13 ऋतुजा खैरनार

14 हेमांगी शिंदे

15 निशांत देसले

त्याच प्रमाणे खालील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

1 नीतू पंजाबी

2 रुपेश कासार

3 संदीप देवरे

 शिक्षक दिनाचे औचित्य साधून Greeting Card बनवण्याची कार्यशाळा सौ वृषाली सोनवणे व वैष्णवी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर संदेश असलेले Greeting Card बनवले व  त्याचे online प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले.

प्राचार्या भारती पंजाबी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षक दिन म्हणजे आपल्या जीवनात आलेले शिक्षक का?  व कसे?  महत्त्वपूर्ण आहेत हे व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्या सौ. भारती पंजाबी समन्वयक श्री तुषार देवरे श्री वैभव सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here