चौफेर न्यूज – साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार असून मुलांचे ३१ डिसेंबपर्यंतचे वय गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे प्राथमिक कौशल्ये विकसित होण्यापूर्वी लेखन, वाचन असा अभ्यासाचा भार साडेपाच वर्षांच्या मुलांना सोसावा लागणार आहे.पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे वयाची अट ही कागदोपत्रीच राहिली आहे.

दरम्यान प्राथमिकला तिसऱ्या वर्षांपासून प्रवेश देण्याची अट २०१० मध्ये निश्चित करण्यात आली. पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षांची अट निश्चित करण्यात आली होती. २०१० पासून टप्प्याटप्प्याने दरवर्षी वयाचा निकष बदलण्यात आला. प्रत्यक्षात पहिलीतील प्रवेशासाठी हा निर्णय कागदोपत्रीच राहिल्याचे दिसत आहे. सव्वापाच-साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळत आहे. आता साडेपाच वर्षांच्या मुलांना प्रवेश देणे अधिकृत होणार आहे.

१५ ऑक्टोबपर्यंत सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिली प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात आले. तरीही ही अट पुन्हा बदलण्याची पालकांची मागणी होती. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२१-२२) ३१ डिसेंबपर्यंत सहा वर्षे पूर्ण होत असलेल्या मुलांना जूनमध्ये पहिलीच्या वर्गात बसवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे कागदोपत्री प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण अशी अट असली तरी वर्गात साडेपाच वर्षांची मुले बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here