चौफेर न्यूज – राज्यातील सरकारी व खासगी आयटीआयमधील प्रवेशप्रक्रिया ऑगस्टपासून सुरू आहे. प्रवेशाच्या नियमित चार फेरी पूर्ण झाल्या. त्यानंतर समुपदेशन फेरी गुरुवारी संपली. याचदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.कारण या विध्यार्थ्यांसाठी संधी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.आजपासून( १ जाने .) ४ जाने. पर्यंत त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, प्रवेशअर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यानंतर ५ जाने.ला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here