चौफेर न्यूज – राज्यातील नववी व दहावीत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने पुढाकार घेत त्यांच्यासाठी प्रथमच कार्यपुस्तिकांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नववीसाठी 9 आणि दहावीसाठी 9 अशी एकूण 18 पुस्तके आहेत. ती पीडीएफ स्वरुपात बालभारतीच्या संकेतस्थळावर विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे.

आतापर्यंत बालभारतीकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या वैकल्पिक विषयांसाठीची पाठ्यपुस्तके उपलब्ध नव्हती.

ही उणीव दूर करत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यासाठी गृहशास्त्र, शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, हस्तभरतकाम, पुठ्ठाकाम आणि पुस्तकबांधणी, पाककला, शिवणयंत्राद्वारे शिलाई आणि शिवणयंत्राची निगा-दुरुस्ती, भारतीय संगीत, चित्रकला आणि रंगकाम, दूध आणि दुधाचे पदार्थ, घरगुती विद्युत उपकरणे, टाकाऊ वस्तूंपासून सौंदर्याकृती ही पुस्तके करण्यात आली आहेत.

नववी आणि दहावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक विषयांच्या कार्यपुस्तिका पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठीही ही पुस्तके मार्गदर्शक ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here