चौफेर न्यूज – कोरोनाचा विळखा सैल होत असल्याने शहरातील इयत्ता 9 वी ते 12 वीच्या माध्यमिक शाळा आणि कनिष्ट महाविद्यालये सोमवार (दि. 4) पासून सुरु झाली आहेत. महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात केवळ विद्यार्थ्यांची 32 टक्के हजेरी दिसून आली तर पालकांनी संमतीपत्रे भरून न दिल्याने खासगी शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत अनास्था दिसून आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे गेले सात महिने शाळा आणि महाविद्यालये आॅनलाईन सुरू होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने 9 वी ते 12 वी शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, शहरातील सत्ताधारी भाजपाने त्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे गेले दोन महिने शाळा सुरू झालेल्या नव्हत्या. तिसऱ्या टप्यात 4 जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन केले होते. त्यानुसार आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. महापालिकेची अठरा माध्यमिक विद्यालये आजपासून सुरू झाली. तर काही खासगी संस्थांनीही शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, पहिल्या दिवशी उपस्थिती अत्यल्प असल्याचे दिसून आले.

अशी घेतली जातेय खबरदारी
१) महापालिकेच्या वतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात नियमावली तयार केली आहे. त्यानुसार शिक्षकांची कोरोना तपासणी केली. शाळांना निर्जुंतुकीकरणाची व्यवस्था करण्याचे सुचविले होते. त्यानुसार शाळांमध्ये पहिल्या दिवशी मुलांचे तापमान तपासणी, आॅक्सीजन तपासणी करण्यात आली. तसेच स्वच्छतागृहे आणि साबण आणि सॅनिटायजर ठेवण्यात आले होते. तसेच वर्गखोली आणि स्टाफरुममध्ये फिजिकल डिटन्स दिसून आले. वर्गखोल्यांतील बाकांवर मुलांची एकआड एक बसण्याची व्यवस्था केली होती. पहिल्या दिवशी फिजीकल डिस्टन्स दिसून आले.

मुख्याध्यापकांवरही जबाबदारी
शाळा सुरू करताना मुख्याध्यापकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांना पत्र पाठविले आहे. महापालिकेने कोवीड संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही, याबाबत देखरेख करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर दिली आहे. शिक्षकांचा कोवीड अहवाल शाळेच्या दप्तरी ठेवावे, शाळा परिसरात विद्यार्थी मास्कचा वापर करीत आहेत की नाहीत. मार्गदर्शक फलक लावणे, तसेच प्रार्थनेच्या वेळी किंवा खेळाच्या मैदानावर विद्यार्थी फिजिकल डिस्टन्सचे पालन करतात की नाही, यावर देखरेख करणे, तसेच शाळेचा परिसर दररोज स्वच्छ करतो की नाही. स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ होतात की नाही. तसेच शाळेतील वर्ग स्वच्छ करण्याविषयीचे नियंत्रण मुख्याध्यापकांकडे दिले आहे.

शाळेचे नाव, उपस्थिती, टक्केवारी
1) केशवनगर शाळा 67 21.73
2) संततुकारामनगर 18 39.13
3) पिंपरीनगर 18 26.28
4)काळभोरनगर 57 26.49
5) कासारवाडी 18 67.92
6) पिंपळेगुरव 234 36.40
7) फुगेवाडी 31 32.29
8) निगडी। 85 31.30
9) वाकड 33 21.10
10) खराळवाडी। 52 54.69
11) भोसरी 82 35.34
12) थेरगाव 272 40.00
13) पिंपळेसौदागर 145 50. 84
14 नेहरूनगर 48 6.76
15) आकुर्डी (उर्देू) 27 25.00
16) रुपीनगर 47 6.65
17) लांडेवाडी 46 42.70
18) क्रीडा प्रबोधिणी 40 40.45
………………………………….
एकुण 1355 32.50

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here