चौफेर न्यूज –   कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्लयाचे बंद होती़ मात्र, टप्प्याटप्प्याने ती सुरु करण्यात येत आहे़ सुरुवातीला ९ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यात आले होते़ त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ५ ते ८ वीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरु करण्याच्या सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिले आहे़ त्या पार्श्वभमीवर जिल्ह्यात ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू करण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सांगितले़ दरम्यान, यातील काही शाळा पालकांच्या परवानगीने सुरू करण्यात आल्या आहेत. उर्वरीत शाळा सुरू करण्यासाठीचीही तयारी पूर्ण झाली आहे़.

दरम्यान, जिल्ह्यात शनिवारपासून आरोग्य सेवकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत शिक्षकांचेही लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांच्याकडे केली असल्याचे शिवतरे यांनी सांगितले आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यास शिक्षकांचेही लसीकरण करून शाळा सुरू करता येईल असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात ९ वी ते १२ वीच्या माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी या शाळेतील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या केल्या होत्या़ शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे निजंर्तुकीकरण करण्यात आले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती मोजक्या स्वरूपात होती. त्यानंतर हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या वाढली. मात्र, अद्यापही कोरोनाच्या धास्तीने काही पालक पाल्यांना शाळेत पाठवण्यास धजावत नव्हते. असे असले तरी ९ वी ते१२ वीच्या सर्व शाळा सुरळीत सुरू झाल्या होत्या. शुक्रवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ५ ते ८ वी च्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील काही शाळा या पालकांच्या संमतीने सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनाही कल्पना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here