सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली असून 1 जुलै 2016 पासून नवा महागाई भत्ता लागू होणार आहे.
महागाई भत्त्यातील वाढीचा 48 लाख कर्मचारी व 55 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. यापुर्वी मार्च 2016 मध्ये केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ करण्यात आली होती.
गेल्या वर्षी ऑक्टोबर 2015 मध्ये महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर मार्च 2016 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 6 टक्क्यांनी वाढून125 टक्के करण्याची घोषणा केली.