चौफेर न्यूज –   19 फेब्रुवारी 2021 रोजी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री प्रशांत भीमराव पाटील सर,प्राचार्या सौ.वैशाली लाडे मॅडम व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर श्री.राहुल अहिरे सर व श्री.तुषार देवरे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

     भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी)या रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो.हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात.उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रथम उद्दिष्ट आहे.

    सकाळी सूर्योदयानंतर श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो.सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे.हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक,मानसिक व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे.

     सूर्यनमस्कारात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे.ते बारा पवित्रे असे आहेत.

१) प्रणामासन किंवा नमस्कारासन

२) हस्त उत्तासन

३) पादहस्तासन

४) अश्‍वसंचालनासन

५) पर्वतासन

६) अष्टांग नमस्कार

७) भुजंगासन

८) पर्वतासन

९) अश्‍वसंचालनासन

१०) पादहस्तासन

११) हस्त उत्तासन

१२) प्रणामासन

       हे नमस्कार घालतांना प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे ‘ओम मित्राय नमः’ आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे.एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालायचे.

ही बारा नावे अशी आहेत.

१) ओम मित्राय नमः

२) ओम सूर्याय नमः

३) ओम खगाय नमः

४) ओम हिरण्यगर्भाय नमः

५) ओम आदित्याय नमः

६) ओम अकार्य नमः

७) ओम रवये नमः

८) ओम भानवे नमः

९) ओम पूष्णय नमः

१०)ओम मरिचये नमः

११)ओम सवित्रे नमः

१२)ओम भास्कराय नमः

    कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सूर्य नमस्कार करून सूर्य देवाची उपासना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here