चौफेर न्यूज – नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्कॉलरशिप प्राप्त करू शकतात. नुकेतच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हे पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले आहे. एनएसपीद्वारे आता विद्यार्थी जवळपास 16 नॅशनल लेव्हल स्कॉलरशिपसाठी अ‍ॅप्लाय करू शकतात. यापैकी बहुतांश स्कॉलरशिप मॅट्रिक लेव्हलच्या आहेत. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाद्वारे या पोर्टलचे संचालन केले जाते.

विद्यार्थी एनएसपी पोर्टलद्वारे स्कॉलरशिप संबंधित कोणतीही माहिती प्राप्त करू शकतात. केंद्र सरकारकडून वेळोवेळी नॅशनल स्कॉलरशिपसाठी फॉर्म काढले जातात. केंद्र सरकारची विविध मंत्रालये जसे की – अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, उच्च शिक्षण विभाग, जनजाती कार्य मंत्रालय, रेल्वे मंत्रालय इत्यादी द्वारे स्कॉलरशिप प्रोग्राम जारी केले जातात. विद्यार्थी या वेबसाइटवर जाऊन स्कॉलरशिपच्या संबंधित सर्व आवश्यक माहिती प्राप्त करू शकतात. पात्रतेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

ही कागदपत्रे आवश्यक
जर तुम्ही मॅट्रिक लेव्हलवर अ‍ॅप्लाय करत असाल तर 10वीची मार्कशीट आणि इंटरमीजिएट लेव्हलवर अप्लाय करत असाल तर 12वीची मार्कशीट दाखवणे आवश्यक असेल. जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर अप्लाय केले असेल तर ग्रॅज्युएशनची मार्कशीट दाखवावी लागेल. याशिवाय, मोबाइल नंबर, बँक अकाऊंट डिटेल्स, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी दाखला मागितला जातो.

जाणून घ्या कसे करायचे अप्लाय
* अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जवळ आवश्यक डाक्यूमेंट्स ठेवावे लागतील.
* यानंतर नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाइटवर (scholarships.gov.in) जावे लागेल.
* वेबसाइटवर जाऊन तुम्हाला (new registration) ऑपशनवर क्लिक करावे लागेल.
* येथे जाऊन तुम्हाला तुमचे प्रोफाइल क्रिएट करावे लागेल. प्रोफाइल क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडून आवश्यक माहिती मागितली जाईल.
* अकाऊंट क्रिएट केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर जाऊन काही प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील. जसे की, तुमचे उत्पन्न किती, भारतीय विद्यार्थी आहात किंवा नाही, इत्यादी.
* सर्व माहिती दिल्यानंतर आवश्यक कागदपत्र मागितली जातील.
* कागदपत्र दिल्यानंतर कॉलेज किंवा शाळेचे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मागितले जाईल.
* शाळा किंवा कॉलेजकडून व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट साईन केल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या अकाऊंटवर जाऊन फॉर्म सबमिट करू शकता.
* फॉर्म भरल्याच्या तीन ते सहा महिन्यानंतर गाईडलाईन्सनुसार तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे येण्यास सुरूवात होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here