चौफेर न्यूज – करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात दि. 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे एक आठवड्यापूर्वी सुरू झालेले महाविद्यालयाचे नियमित वर्ग बंद होणार आहेत. परिणामी, आता ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन अध्ययन-अध्यापनासाठी शिक्षणसंस्थांना पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. त्यानुसार आता शिक्षणसंस्थांनी ऑनलाइन शिक्षणाच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

करोना प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे शासनाने दि. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली. त्यानुसार नियमित वर्ग सुरू झाले. प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन होऊ लागल्याने विद्यार्थी-शिक्षकांमध्ये उत्साह होता. ऑनलाइनपेक्षा वर्गातील शिक्षणच योग्य असल्याची भावना यानिमित्ताने होत होती. 50 टक्‍के उपस्थितीच्या अटीवर हजेरी होऊ लागल्याने, महाविद्यालयाचा परिसरही बहरत चालला होता.

विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार बहुतांश महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षण यापूर्वीच सुरू ठेवले आहेत. महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक महाविद्यालयांनी ऑफलाइन व ऑनलाइन असे दोन्ही पर्यायांतून शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवली होती. ज्या महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणास प्राधान्य दिले नाहीत, त्यांना मात्र आता ऑनलाइन यंत्रणा कार्यान्वित करून सक्षम करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here