पिंपरी : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा भोसरी येथील क्वालिटी सर्कल फोरमच्या सभागृहात नुकतीच पार पडली. लघुउदयोजकांनी या सभेत समस्यांचा पाढाच वाचला.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसी व महावितरणकडून वेळेवर न मिळणार्या सोयी सुविधांच्या बाबतीत तसेच औद्योगिक परिसरातील गुन्हेगारी व चोर्या रोखण्यात अपयशी ठरत असलेल्या पोलीस प्रशासनाबाबत चर्चा करण्यात आली. संघटनेने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यासंबंधातही यावेळी चर्चा करण्यात आली. संघटनेतील सदस्यांच्या सर्व प्रश्नांना पदाधिकार्यांनी उत्तरे दिली.
सभेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. सभासद शिवाजी साखरे यांनी 2016 ते 2020 या काळासाठी निवड झालेल्या संचालक मंडळाच्या मंजुरीचा प्रस्ताव मांडला व मंजूर
करण्यात आला.
संघटनेचे खजिनदार संजय ववले यांनी वार्षिक आर्थिक ताळेबंद सभेपुढे सादर केला. संघटनेचे सचिव जयंत कड यांनी उद्योजकांकरिता संघटनेने केलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी उपाध्यक्ष विनोद नाणेकर यांनी औद्योगिक प्रदर्शनाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीबाबत मुद्दे मांडले. उपाध्यक्ष संजय जगताप यांनी अंदाजपत्रक मांडले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, खजिनदार संजय ववले उपस्थित होते.