विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) 22 जानेवारी 2017 रोजी घेतली जाणार आहे. नेट परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना येत्या नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) स्पष्ट करण्यात आले आहे. युजीसीतर्फे प्राध्यापक पदासाठीची ’नेट’ ही पात्रता परीक्षा घेतली जाते. काही वर्षांपासून परीक्षेची जबाबदारी सीबीएसईकडे देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना हीींिं://ललीशपशीं.पळल.ळप या संकेतस्थळावरून येत्या नोव्हेंबरपर्यंत परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येतील. तर, 17 नोव्हेंबरपर्यंत चलनाद्वारे
परीक्षा शुल्क बँकेत जमा करता येईल. तसेच, विद्यार्थ्यांना 22 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत
परीक्षा अर्जात सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. तर, 21 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करुन
दिले जाईल.