चौफेर न्यूज –  सक्षम मोहिमेअंतर्गत महिन्याभरात अनेक कृषी कार्यक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत या वर्षी ‘हरित ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा’ या विषयावर वाद-विवाद स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथील सहा  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांची उत्तम वादविवादक म्हणून निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र बहाल करण्यातआले. उत्कृष्ट वाद-विवादक म्हणून कुमारी भूमिका सुनील पाटील, कुमारी सानिया अमिन शहा तसेच कुमारी लुब्धा केतन दिसले अनुक्रमे इयत्ता नववी व दहावी यांची निवड करण्यात आली.सदरील वादविवाद स्पर्धेचे आयोजन ‘खनिज तेल व नैसर्गिक वायू उद्योग महाराष्ट्र राज्य’ यांच्या तर्फे करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांच्या या वादविवाद स्पर्धेत यशस्वी सहभागाबद्दल संस्थेचे संस्थापक श्री.प्रशांत भीमराव पाटील सर, प्राचार्या श्रीमती वैशाली लाडे, श्रीमती  भारती पंजाबी, तसेच संस्थेचे समन्वयक श्री. वैभव सोनवणे, श्री. तुषार देवरे, श्री. राहुल अहिरे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेतर्फे पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here