चौफेर न्यूज – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. सीबीएसईने हा बदल 14 मे रोजी होणाऱ्या रमजान सणामुळे केला आहे. यापूर्वी 13 आणि 15 मे रोजी परीक्षा होणार होती. पण आता सुधारित वेळापत्रकानुसार 12 मे 2021 ते 17 मे 2021 पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

सीबीएसईद्वारे 10 वी 12 वीच्या सुधारित वेळापत्रकानुसार 13 मे रोजी असणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा फिजिक्सचा पेपर आता 8 जून 2021 ला घेण्यात येणार आहे. गणिताचा पेपर आता 1 जून ऐवजी 31 मे रोजी घेण्यात येणार आहे. 12 वीचा भूगोलचा पेपर आता 2 जून ऐवजी 3 जूनला होईल. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचा विज्ञानाचा पेपर 21 मे आणि गणिताचा पेपर 2 जून रोजी होणार आहे.सीबीएसईद्वारे जाहीर केलेले सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या ऑफिशिअल पोर्टलवर अपलोड केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here