पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी पुरवठा विषयक समस्या नोंदवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नवीन उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये नागरिकांना आता पाणीपुरवठ्याच्या समस्या व्हॉट्स अॅपद्वारे मांडता येणार आहेत.
संबंधित समस्यांसाठी 7722060999 या क्रमांकावर नागरिकांना संपर्क साधता येणार असून याच क्रमांकावर व्हॉट्स अॅप (थहरीीं -रिि) द्वारेही समस्या मांडण्याची सुविधा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी पाणी पुरवठा विषयक तक्रारींसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.