चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ भारती पंजाबी मॅडम ,सौ वैशाली लाडे मॅडम ,व्यवस्थापक श्री वैभव सोनवणे सर ,उपप्राचार्य श्री धर्मराज अहिरे सर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक श्री प्रशांत भीमराव पाटील सर यांनी सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नीतू पंजाबी मॅडम यांनी केले व त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला होता . रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव पण त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा, माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले . ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले .त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी पदवी प्राप्त केली .पुढे इंग्लंड ला जाऊन ते कायद्याचे पदवीधर झाले ,असे विचार व्यक्त केले. तसेच श्री गौतम वाघ सरांनी, आंबेडकरांविषयी माहिती देताना सांगितले की उच्चवर्णीय लोकांकडून वर्षानुवर्ष होणाऱ्या पिळवणूकीने दलित समाज भरडला जात होता, अशा या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे अवघड कार्य आंबेडकरांनी केले .त्यांनी विविध वृत्तपत्रे काढून व परिषदा भरवून दलित समाजात जागृती निर्माण केली .1927 मध्ये दलितांना प्रवेश करण्यास मनाई असणाऱ्या महाडच्या चवदार तळ्यात ते आपल्या जाती बांधवांसह सत्याग्रहास उतरले. 1930 मध्ये त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला. भारताची राज्यघटना व हिंदू कोड बिल ही डॉ. आंबेडकरांची दोन महान कार्य होत .आपल्या महापरिनिर्वाणापूर्वी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता ,असे मनोगत व्यक्त केले .याप्रसंगी सुंदर फलक रेखाटन वैष्णवी थोरात मॅडम व श्री रावसाहेब सावळे सर यांनी केले .या कार्यक्रमाचे संयोजन श्री धर्मराज अहिरे सरांनी केले .या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.