पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक सघांच्या वतीने राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला.
वन रँक वन पेन्शन या योजनेसाठी विष प्राशन करून आत्महत्या केलेले माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी गेल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
ज्येष्ठ नागरिक संघाचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी सैनिकांना वॅन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, मोदी सरकाराला दोन वर्ष उलटून गेले तरी योजना लागू झाली नाही. त्यामुळे माजी सैनिकांमध्ये मोदी सरकारबद्दल नाराजी आहे. या नाराजीतूनच माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असून मोदी सरकारच्या काळात माजी सैनिकांना बुरे दिन आले आहेत.
आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाच्या ग्रेवाल यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेल्यावर दिल्ली पोलिसांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अटक केली. त्याचा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक सघांच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here