नाशिक येथे रंगला खान्देश साहित्य सांस्कृतिक महोत्सव
रांना मिळाले जीवन गौरव पुरस्कार
साहित्य- सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे विश्राम बिरारी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलाभूषण पुरस्कार : अश्‍विनी कासार, खान्देशभूषण पुरस्कार : अजित चव्हाण, भय्रा पाटील, पंकज निकम, विजरराज पाटील, कला गौरव पुरस्कार : अमोल थोरात, सुभाष शिंदे, पुष्पा ठाकूर, सुनील ढगे, साहित्रभूषण पुरस्कार : डॉ. रमेश सूर्रवंशी, नाना खेडीकर, आबा पाटकरी, समाजभूषण पुरस्कार : आशाबाई रंधे, रजनी घुगे, शाहीरभूषण पुरस्कार : शाहीर शिवाजी पाटील, संगीतभूषण पुरस्कार : रेखा महाजन
अक्षरभूषण पुरस्कार : किशोर कुलकर्णी, साहित्ररत्न : सुनील गारकवाड.

एकपात्री नाट्य, लोकसंगीत नृत्य, चर्चासत्र
महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पुष्पा ठाकूर, जितेंद्र पिंगळकर, रूचा बिरारी ग्रुप रांच्रा अहिराणी लोकसंगीत नृत्र कार्रक्रमाचे आरोजन करण्रात आले होते. रा लोकसंगीत नृत्र कार्रक्रमातून विविध पारंपरिक गीत सादर करून कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळवली.
’कॉमेडीची बुलेट ट्रेन’ रा मालिकेतील कलाकार रोगेश शिरसाठ आणि शाम राजपूत रांना या वेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्रात आले. रावेळी व्रासपीठावर दीपक सैंदाणे, विजरा मानमोडे, डॉ. एम. ए. ठमके, रोगेश शिरसाठ, शाम राजपूत, उत्तम कांबळे, लता कांबळे, वंदना बनकर आदी उपस्थित होते.

नाशिक : काळाच्रा ओघात भाषा बदलणे अटळ असते. आपल्रा वेशीच्रा अवतीभोवती लोंबकळणार्‍रा बोली भाषांना प्रतिष्ठा देणे गरजेचे असल्राचे मत साहित्यिक, ज्रेष्ठ लेखक उत्तम कांबळे रांनी व्यक्त केले.
खान्देश अहिराणी कस्तुरी मंच महाराष्ट्र आणि नाशिक महापालिका रांच्रातर्फे नाशिक येथील कालिदास कलामंदिरात खान्देश साहित्र, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तम कांबळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उद्योजक उमेश राठी रांच्रा हस्ते रा दोनदिवसीर महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी कांबळे बोलत होते.
भाजपाचे नाशिक शहराध्रक्ष आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर गुरमित बग्गा, माजी सभापती शिवदास माळी, जेष्ठ पत्रकार तुळशिदास भोईटे, भाजपचे प्रदेश चिटणिस लक्षमण सावजी, जेष्ठ अहिराणी साहित्यिका डॉ. उषा सावंत आदी या वेळी उपस्थित होते.
उत्तम कांबळे या वेळी म्हणाले की, जागतिकीकरणात संहाराची साधने मोठ्या प्रमाणात तरार होत आहेत. धर्म, संस्कृती, अर्थकारण, संरक्षण, नव्रा बाजारपेठा रामुळे प्रादेशिक भाषांसमोर धोका निर्माण होत आहे. नव्रा तंत्रज्ञानाची भाषा शिकण्रासाठी आपली भाषा बाजूला ठेवावी लागत आहे. आजही अहिराणी भाषा बोलणारा मोठा समूह असून अलीकडची पिढी मात्र अहिराणी बोलत नाही.
राठी या वेळी म्हणाले की, अहिराणी भाषा कमी बोलली जाते. ही भाषा मागे पडत चालली आहे. तसेच आजची पिढी ज्रा तत्परतेने विदेशी भाषा शिकते त्रा तुलनेने अहिराणी भाषा
शिकत नाही.
विजरा मानमोडे रांनी प्रास्ताविक केले. ’जीवन गौरव पुरस्कारा’चेही या वेळी वितरण करण्रात आले. ’अहिरराष्ट्र कान्हदेस’ रा मासिकाचे या वेळी प्रकाशन करण्रात आले; पारंपरिक अहिराणी गीते, लग्नगीत, उखाणा, म्हणी आदिंचे सादरीकरणही या वेळी करण्रात आले.
कलाकारांनी वेधले लक्ष
अभिनेत्री शितल आहिरराव हिने अहिराणी गीतांवर सादर केलेल्या बहारदार नृत्याने सर्वांचेच लक्ष वेधले. कलर्स वाहिनीवरील कमला फेम आश्‍विनी कासार हिने तिच्या खास शैलीत सादर केलेल्या ‘अव्वा’ आणि ‘थँक्स’ला सर्वांनी दाद दिली. ‘ओ तुनी माय’मधील अमोल थोरात व अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांनीही उपस्थितांची मने जिंकली. रेखा महाजन आणि राजेंद्र जाधव शिरपूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
आमंत्रीत अहिराणी कवी संमेलनही या वेळी झाले. जेष्ठ कवी मंगला रोकडे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जेष्ठकवी कमलाकर देसले, रंजन खरोटे, शाहीर श्रावण वाणी, ज्ञानेश्‍वर भामरे, राजेंद्र वाघ, अनुराधा धोंडगे, नाना महाजन, चेतन पाटील, तुषार पाटील, मिलींद धोंदरे, प्रकाश पाटील आणि विजया नेरकर यांनी या संमेलनात अहिराणी कविता सादर केल्या.
अर्पिता मानमोडे व त्यांच्या गृपने अहिराणी गाण्यांवर नृत्य सादर केले. ‘आतेना आणि पयलाना जमाना’ यातून विनोदी अंगाने दोन पिढ्यांवर केलेल भाष्य विजय पवारांनी सादर केले. ‘सख्यान आयत पोयत’मधून खास अहिराणी शैलीतून सादर झालेले लग्नातील वर्णन, ‘तूयातल्या गंमती जंमती’ प्रवीण माळी यांनी सादर केल्या.
खान्देश आणि साहित्य – संस्कृती या खुला विचार मंचमध्ये प्रा. राकेश वानखेडे, डॉ. फुला बागुल, डॉ. उषा सावंत आणि योगेश कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. डॉ. सयाजी पगार अध्यक्षस्थानी होते. अहिराणी संस्कृती, ग्रामदेवता, भाषा, ओव्या, लोकगीत व संस्कृतीबाबत या वेळी चर्चा झाली.
बहुभाषिक कविसंमेलनात 32 कवींनी सहभाग घेतला. सारीका रंधे कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले. सांगली येथून आलेले सुरेश सकटे व नागपूर येथून आलेेले आलेले एम. के. ठमके यांच्या हस्ते या वेळी कवींना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
अंध कवी काशीनाथ महाजन यांनी अहिराणी ब्रेललिपीने गाऊन कविता सादर केली. मिनाक्षी थोरात, समाधान गायकवाड, प्रज्ञा गोपाळे, शरद धनगर, नाना महाजन, चेतन पनेर, संजय ठाकरे, अजय बिरारी, शिवाजी ठाकरे, शिवाजी महाले, सचिन पाटील, अशोक माळी, सदाशिव सूर्यवंशी, सोमनाथ गायकवाड, अलका कोठावदे, प्रभा कोठावदे, श्रीकृष्ण बेडसे, राजेंद्र पारे, दीपक सैंदाने, निर्मला पाटील, नरेंद्र सोनावणे, राजेंद्र जाधव, रंजन खरोटे आदींनी या वेळी कविता सादर केल्या.
संघपाल तायडे, नाशिकच्या खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष शंकर पाटील, रजनी घुगे, डॉ. आशा देवळीकर, वाल्मीक सोनवणे, अभिजित मानमोडे, आनंद करंजकर, मनीषा ढोले, रोहित मानमोडे, कुणाल पाटील, प्रशांत देशमुख, शामकांत धोंडगे, नीलेश चव्हाण, दीपक सैंदाने, योगेश सूर्यवंशी, वाल्मीक महाले, राहुल सोनवणेे, मनीषा भामरे यांनी संयोजन केले. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी विजया मानमोडे यांनी ‘काय सांगू सये बाई मन्ह माहेरनं कौतूक’ ही अहिराणी कविता सादर केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here