‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण वापरतो. थंडी व पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आल्याचा चहा सर्वांना हवा हवासा वाटतो तो घेतला तर आळस व थंडी दूर होऊन तरतरी, ऊर्जा  निर्माण होते. या आर्द्रकाचे  महत्व व उपयोग समजून घेऊया.

#  जेवणा आधी आलं व शंदेलोण एकत्र करून खाण्याची पूवार्पार परंपरा आहे. जेवणाआधी हा योग्य उपाय केल्याने भूक लागते, अग्नी वाढतो, तोंडास रुची येते. जिभेवर येणारा साका किंवा बुळबुळीतपणा कमी होतो, कफ कमी होऊन घास साफ होतो. तसेच जास्त प्रमाणात किंवा सतत ढेकर येत असतील तर पादेलोण घालून आल्याचा रस घ्यावा.

#  अजीर्ण, पोट दुखी, पोट फुगी, घश्याशी आंबट पाणी येणे इ. लक्षणे असताना आयुर्वेदात एक गुडार्द्रक प्रयोग वर्णीला आहे. हा उपक्रम 11 दिवसांचा आहे.  पहिल्या दिवशी प्रत्येकी  100 mg गूळ व आले खावा, दुसऱ्या  दिवशी प्रत्येकी 200 mg गूळ व आले खावा, तिस-या दिवशी प्रत्येकी अर्धा gm गूळ व आले खावा,  चौथ्या दिवशी प्रत्येकी 1 gm गूळ व आले खावा,  5 व्या दिवशी प्रत्येकी 2 gm गूळ व आले खावा,  6 व्या दिवशी प्रत्येकी 2 gm गूळ व आले खावा, 7 व्या दिवशी प्रत्येकी 8 gm गूळ व आले खावा, 8 व्या दिवशी प्रत्येकी 10 gm गूळ व आले खावा, 9 व्या दिवशी प्रत्येकी 20 gm गूळ व आले खावा, 10 व्या दिवशी प्रत्येकी 40 gm गूळ व आले खावा, 11 व्या दिवशी प्रत्येकी 80 gm गूळ व आले खावा, अशा रीतीने आले व गूळ वाढवत जावे व 12व्या दिवसापासून पुनरपि उतरत्या प्रमाणात घ्यावे. हा उपक्रम करताना तिखट, तळलेले पदार्थ खाऊ नये. फक्त दूध भात खावा तहान लागल्यास फक्त दूध प्यावे. हा प्रयोग केल्याने अपचनाचे विकार बरे होतात. हा प्रयोग नजीकच्या वैद्याच्या देखरेखी खाली करावा. पचन व श्वास संस्थांवर आल्याचे कर्म उत्तम प्रथिने दिसते.

#  पावसाळ्याच्या दिवसात दम लागत असल्यास  आल्याचा रस 10 मिली, तूप 5 मिली, साखर 2.5 मिली एकत्र करून घेतल्यास दम कमी लागतो.

#  छातीत दुखत असल्यास आल्याच्या रस 20 मिली आणि साखर 5 मिली एकत्र करून घेतल्यास छातीचे दुखणे कमी होते.

# अजीर्ण, पोट फुगणे व पोट दुखी ही लक्षणे असताना आल्याचा रस आणि चिमूटभर हिंग पोटाला वरून लावल्याने उदरातील वेदना कमी होण्यास मदत होते. उदरामध्ये वेदना अधिक जाणवल्यास अद्रकांचा रस 10 मिली आणि लिंबाचा रस 5 मिली एकत्र करून घ्यावे त्याने वेदना कमी होतात.

#  शरीर थंडगार पडत असेल किंवा थंडी बरोबर अंग दुखत असेल त्यावेळी आल्याचा रस, हिंग व लसणाचा रस एकत्र करून शरीराला लावल्यास गारव्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होऊन शरीरामध्ये उष्णता निर्माण होते.

#  आमवात आजारामध्ये सांध्यांच्या ठिकाणी सूज व तीव्र वेदना असताना आल्याचा रस मिठाबरोबर चोळल्याने वेदना व सूज कमी होते.

# स्त्रियांना पाळी योग्य वेळीस येत नसेल व अंगावरून कमी जात असेल तर आल्याचा रस नाकात घेतल्यास उत्तम फायदा होतो.

घरच्या घरी आलेपाक व आल्याचे पाचक बनविण्याची कृती व कोणकोणत्या आजारासाठी ते रामबाण ठरू शकते ते पाहू या

# आले पाक – आल्याचा रस 200 मिली, पाणी 800 मिली आणि साखर 800 ग्रॅम या प्रमाणात एकत्र करून पाक करावा त्यात केशर, वेलची, जायफळ, जायपत्री, लवंग, ही द्रव्ये पाकात एकत्र करावी या आलेपाकाचा उपयोग दमा, खोकला, अपचन, चव नसणे, अंगदुखी या वर फारच प्रभावी ठरू शकतो.

# आल्याचे पाचक – आल्याचा किस 1 पाव  त्यात तेवढेच लिंबाचे रस व चवीनुसार काळे मीठ आणि सैंधव मिसळून काचेच्या बरणीत ठेवावे. पोट दुखी, तोंडाला चव नसणे, तापानंतर आलेली अरुचीस उपयुक्त आहे.

आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राखण्यासाठी आर्द्रक म्हणजेच आल्याचे फायदे आपण पाहिले घराच्या घरी या सहज सोप्या टिप्स आपला पैसा व वेळ ही वाचवू शकतो आणि एक फायदेशीर अनुभव ही ठरू शकतो.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here