नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काल संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. गडकरी यांच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आणि आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. वृत्तानुसार, नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.