बोराडे वाडी येथे कचरा स्थानांतर केंद्रा ऐवजी उद्यानच करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आयुक्त शेखर सिंग यांना सूचना
बोराडे वाडी मोशी येथे आम्ही घर घेतली हा आम्ही गुन्हा केला का असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासमोर सोसायटी धारक प्रतिनिधींनी केला उपस्थित बोराडेवाडी, मोशी येथील कचरा स्थानांतर केंद्राला विरोध अतिश पारणे व कविता अल्हाट यांच्या नेतृत्वाखाली घेतली सोसायटी धारकांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट.
बोराडे वाडी मोशी येथे सर्वे 230 (1347) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थलांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशी मध्ये कचरा डेपो आहे. तसेच रिवर रेसिडेन्सी येथील रद्द करण्यात आलेला सांडपाणी प्रकल्प त्याच्याच खाली 200 मीटर वर सुरू असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यातच आता प्रत्यक्ष तरी कार्यालयांतर्गत प्रत्येकी दोन कचरा स्थानांतर केंद्र करण्यात येणार आहेत. जुना प्रभाग क्रमांक दोन सहा आठ नऊ यांपैकी बोराडेवाडी येथेच एकच राजस्थान अंतर केंद्र उद्यानाची जागा आरक्षित असताना त्या जागेवर हे केंद्र उभा करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता.त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतिश बारणे व महिला आघाडीचे अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी माजी आ. विलास लांडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील सोसायटीतील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांना दूरध्वनी वरून
संपर्क साधत माझ्या कार्यकत्योंना वाली नाही असे समजू नका, त्यांनी मांडलेले प्रश्र ही सोडविण्यासाठी प्राधान्य द्या, एकतफी निर्णय घेऊ नका, नागरिकांच्या मागणी नुसार ज्या त्या मुद्व्याली प्राधान्य द्या अशा सूचना देत बोहाडेवाड़ी येथील कचरा स्थानांतिर कैंद्र हलवून त्याठिकाणी उद्यानाच करा असा आदेश दिला. त्यासंदर्भात या. शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतल्यानंतर त्यानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेला मान्यता देत कचरा स्थानांतर कैंद्राएऐवजी उद्यान उभा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी मुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटणाऱ्या शिष्ट मंडळात अश्विनी सस्ते, जीवन सत्ते, काशिनाथ दरी, उमेश उगिले, विनोद शिर्के, प्रभाकर गुरव, चंद्रकांत बिरादार, विठ्ठल आहेर, आप्पासाहेब कोळी, बंडू मगरे, वैभव थोरात, प्रवीण सूर्यवंशी, अरुण जाधव, प्रकाश पवार, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
हॉर्स रायडिंग ऐवजी क्रीडांगण करा
तसेच 24 मीटर रस्त्यावरील मोकळे मैदानी आरक्षण 1/137 येथे हॉर्स रायडिंग साठी विकसित करण्यात येणार आहे. त्यालाही परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी स्वराज्य क्रिस्टल ऐश्वर्या हमारा शुभ योग पृष्टीन ग्रीन सिल्वर नाईन सोसायटीतील नागरिकांनी विरुद्ध दर्शविला आहे जुना प्रभाग क्रमांक दोन येथे मैदान नसल्याने परिसरातील खेळाडू या मैदानावर सराव करीत आहेत तसेच या ठिकाणी ओपन जिम असल्याने परिसरातील नागरिक व महिला व्यायामासाठी वावर करत होते परंतु महापालिका प्रशासनाने या ठिकाणी हॉर्स रायडिंगचा साठी जागा आरक्षित केल्यामुळे परिसरातील मुलांनी खेळण्यासाठी खाजगी व्यावसायिकाकडे पैसे मोजून खेळायचे का असा सवाल ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समरूप उपस्थित केला त्या संदर्भात ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलांची सराव व कोटी खेळायचे असा सवाल आयुक सिंग यांनी केला आहे.
एकतर्फी निर्णय घेवू नका…
आपण काही निर्णय एकतर्फी घेत आहात यापुढे असे चालणार नाही नागरिकांच्या दृष्टीने व त्यांचा विचार करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे यापुढे कोणतेही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचे नाहीत मी महापालिकेमध्ये मीटिंग घेणार आहे त्यावेळी नागरिकांच्या सहवासीयांच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत फक्त कोणीतरी सांगत आहे म्हणून जर आपण काही निर्णय घेत असाल तर ते थांबवा माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रश्न मांडले तर त्यावरही विचार करा तुम्हाला माझे काम करण्याची पद्धत माहिती आहे कोणतेही ही निर्णय यापुढे एकतर्फी झाले नाही पाहिजेत असा सज्जड दम अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंग यांना दिला.
मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर शिष्ट मंडळ भेटल्यानंतर सोसायटी धारकांच्या प्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपाध्यक्ष अतीश बारणे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता अल्हाट नगरसेवक वसंत बोराटे चिखली मोशी फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने विशाल आहेर अश्विनी सस्ते जीवन सस्ते काशिनाथ दरी उमेश वगैरे विनोद शिर्के यांनी आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतली. यावेळी बोराडे वाडी येथे कचरा स्थानांतर केंद्र होत आहे, रिव्हर रेसिडेन्सी येथील सांडपाण्याचा प्रकल्प स्थानांतर केंद्रापासून अडीचशे ते तीनशे मीटरवर होत आहे तसेच शहरातील सर्व कचरा मोशी येथे अवघ्या एक ते दीड किलोमीटरवर टाकण्यात येत आहे असल्याने सर्व प्रकल्प केंद्र मोशी व प्रभाव परिसरातील भागातच होत आहे हे निदर्शनास आणून देत हा मोशी परिसरातील विविध उपनगरावर अन्याय होत नाही का? हा प्रश्न पटवून दिल्याने बोराडेवाडी सर्वे नंबर 230 मधील कचरा स्थानांतर केंद्र मोकळे मैदाना आरक्षण क्रमांक 1/137 मध्ये हॉर्स रायडिंग ऐवजी त्या ठिकाणी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून इतर क्रीडांगण विकसित करावी, अशी मागणी आयुक्तांना भेटलेले सिस्टमंडळाने केले त्याबाबत ही सकारात्मक विचार करण्यात येईल असा विश्वास आयुक्तसिंग यांनी व्यक्त केला.
अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत उत्साह
महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे बहुतांशी भाजपच्या आमदार, नगरसेवक व पदाधिकारी जे सांगतील तीच पूर्व दिशा असल्याची चर्चा आहे. परंतु राज्यातील राजकारणात शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे गट एकत्रित असल्यामुळे महापालिकेतील ही राजकारण बदलले आहे. भाजपा बरोबरच अजित पवार गटातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मांडलेल्या प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुक्तांना दिले आहेत. यापुढे कोणतेही निर्णय नागरिकांच्या विरोधात कोणतरी सांगत आहे, म्हणून घेऊ नका माझी काम करण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे. यापुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रश्न बाबत मी स्वतः लक्ष घालणार आहे, असे खुद्द आयुक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्यामुळे राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.