साक्री : तालुकास्तरीय १७ वर्ष वयोगटातील फुटबॉल स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने दणदणीत विजय मिळविला. अंतिम सामन्यात प्रचिती स्कूलच्या संघाने डी.जे. अग्रवाल स्कूलच्या संघाचा ३-० फरकाने पराभव करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. https://fb.watch/mzbu_AlLl3/?mibextid=Nif5oz
प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात १७ वर्ष आतील फुटबॉलच्या सामन्याचे उद्घाटन झाले. यामध्ये प्रचिती इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध डी. जी.अग्रवाल (३-०), गुड शेफर्ड (६-०), ऑर्किड स्कूलचा (८-०) असा पराभव केला. प्रचितीच्या खेळाडुंनी तिनही स्कूलला एकही गोल करू दिला नाही. या स्पर्धेसाठी शाळेचे समन्वयक वैभव सोनवणे व क्रिडा शिक्षक कुणाल देवरे यांनी अथक परिश्रम घेतले. प्रचिती स्कूलच्या सर्व खेळाडूंचे प्राचार्या सौ.वैशाली लाडे व चेअरमन श्री. प्रशांत पाटील यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तालुकास्तरीय स्पर्धेत मोठ्या फरकाने विजय मिळवून प्रचिती इंटरनॅशनल स्कूलची जिल्हास्तरावर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन…