प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे स्वच्छता अभियान
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कुलच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी, शाळेचे समन्वयक राहुल पाटिल, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकांनी या अभियानात सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन तसेच महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.

महात्मा गांधी यांच्याविषयी अर्चना देसले यांनी माहिती सांगितली. अश्विनी मॅडम यांनी लाल बहादूर शास्त्री विषयी माहिती सांगितली. इयत्ता १ लीची विद्यार्थिनी उन्नती शिंदेने महात्मा गांधी विषयी विचार व्यक्त केले. गांधीजीचे तीन तत्त्वे इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांनी कृतीद्वारे मांडले. विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी शाळेचा परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन, रांगोळी रेखाटण्यात आली.

सुत्रसंचालन वैशाली वाघ यांनी केले. आभार रिनल सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.