पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे आज वाईट विचाराच्या रावणाचे दहन करून दसरा सण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील उपस्थित होत्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गरबा खेळून आनंद साजरा केला. तसेच, विद्यार्थी वेगवेगळ्या पारंपारिक पद्धतीने सुंदर अशी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात एकच रंगत आणली. दसऱ्याच्या सणानिमित्त कार्तिक कोठावदे, आर्यन अहिरराव यांनी रामाची भूमिका साकारली.
मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी वही पूजन व सरस्वती पुजन केले. शाळेतील कर्मचारी पप्पू भदाणे यांच्या हस्ते रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रावण दहनाच्या वेळी विद्यार्थ्यांनी “जय श्रीराम, जय श्रीरामचंद्र की जय अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला. प्रसंगी, शाळेचे समन्वयक राहुल अहिरे यांच्या हस्ते वही पूजन व सरस्वती पूजन, लेखणी पूजन यासह शैक्षणिक साहित्य तसेच शाळेतील दरवाजांवर रांगोळी काढून, पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली. शाळेतील स्कूल बसचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करून सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तेजल मॅम यांनी केले. दस-या सणाविषयी अनिता पाटील यांनी माहिती दिली. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.