पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये ‘आनंद मेळावा‘ आणि ‘ख्रिसमस डे‘ मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन ” खान्देश भूषण पुरस्कार प्राप्त प्रशांत भिमराव पाटील, प्रमुख अतिथी डॉ. शितल काले, मनिषा अहिरे (मंडळ अधिकारी, निजामपूर), प्रा. प्रविण सोनवणे, शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या हस्ते औक्षण करून प्रमुख अतिथी यांचे स्वागत झाले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. विद्यार्थीनीनी बेलकम डान्स सादर करून कार्यक्रमात बाहेर आणली. त्याचबरोबर U.K.G.च्या विद्यार्थ्यांनी ‘ख्रिसमस डे‘ निमित्त छान असा डान्स करून सर्वांचे लक्ष वेधले. सांताक्लॉजच्या वेशभूषेत रिषीकेश जाधव या विद्यार्थ्याने छान असे नृत्य सादर केले. केक कापून चिमुरड्यांनी ख्रिसमस डे साजरा केला.
प्रमुख पाहुण्यांनी ‘डिश डेकोरेशन व रांगोळीची उद्घाटन करून आनंद मेळाव्यामध्ये लागलेली स्टॉल, फुडस्टॉल, स्टेशनरी, खेळणी यांची पाहणी केली. तसेच, वेगवेगळ्या स्वादिस्ट पदार्थाचा आस्वाद घेतला. आनंद मेळाव्यात एकूण 26 प्रकारचे वेगवेगळी स्टॉल लावण्यात आले होते. इच्छुक पालकांनी वेगवेगळे पदार्थ व पालकांनी पाल्यासोबत आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर लहान मुलांनी खेळण्यांचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांचा ‘आनंद मेळाव्यात‘ आनंद द्विगुणी झाला. आनंद मेळावा व ‘ख्रिसमस डे‘ कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात आली. बोर्डचे डेकोरेशन करून आनंद मेळावाची रूपरेषा किरण मॅम व माधुरी मॅम यांनी केली. पाहुण्यांचा ओळख परिचय अर्चना देसले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी पगार यांनी केले. काजल राजपुत यांनी आभार प्रदर्शन केले.