राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन
साक्री – : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे सर, वैभव सोनवणे, श्रावण अहिरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक कुणाल पान पाटील यांनी राजमाता जिजाऊ बद्दल माहिती देताना सांगितले की, राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. राजमाता जिजाऊ या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांच्या घरात जन्मलेल्या राजमाता जिजाऊ यांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या प्रेरणेमुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. शिवाजी महाराज 14 वर्षाच्या असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्त केली. निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय वाईट होती .या जुलमी सत्यांच्या कचाट्यातून रयतेला अतोनात त्रास सहन करावे लागत होते .त्यांना या त्रासातून वाचवायला हवं असे जिजामातांना नेहमी वाटे .त्या कर्तबगार आणि दृष्ट्या राजनीतिक्य होत्या. त्यांनी स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले .त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदी स्वराज्याची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या, जीव धोक्यात घालावा लागला. परंतु त्यांनी आपला काळजावरती दगड ठेवून स्वराज्यासाठी शिवरायांना धोका पत्करण्यापासून रोखले नाही .त्यांच्या त्याग्याच्या जीवावरच हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचे भाग्य त्यांना लाभलं नाही. कारण 17 जून 16 74 रोजी किल्ले राजगड जवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. असे मनोगत व्यक्त केले. शाळेच्या शिक्षिका हेमांगी गवांदे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल माहिती देताना सांगितले की, स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र दत्त असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वर देवी असे होते .आई-वडिलांच्या चांगल्या मूल्यांमुळेच विवेकानंदांच्या जीवनाला चांगला आकार मिळाला व ते गुणवत्तेचे धनी झाले. स्वामी विवेकानंद हे भारताचे एक प्रतिष्ठित विद्वान, संत, विचारवंत, तत्वज्ञ आणि लेखक होते. भारतातील रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे संस्थापक होते. स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी संभाषण, सखोल अध्यात्मिक ज्ञान, त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व, पाश्चात्य आणि पूर्वेकडील संस्कृतीच्या विस्तृत ज्ञानामुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्यांनी पाश्चात्य देशांमध्ये हिंदू धर्माचे भारतीय तत्त्वज्ञान मांडले आणि वेदांत चळवळीचे नेतृत्व केले त्यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतो असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सोनवणे सरांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन श्रावण अहिरे सरांनी केले. शिवम वाघ आणि ज्ञानदा पवार हे दोघे विद्यार्थी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या वेशभूषेत आले. सुंदर फलक लेखन भूपेंद्र साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग , शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.