नवी सांगवी : येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेजच्या १० वी आणि १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. या सोहळ्यास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या अंगी सातत्य, चिकाटी असेल आणि संघर्ष करण्याची क्षमता असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात सहज यश संपादन करू शकतो हा यशाचा मंत्र शंकर जगताप यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजूअण्णा जगताप, संस्थेचे सदस्य सूर्यकांत गोफणे, डॉ. विकास पवार, प्रा.प्रताप बामणे, स्वाती पवार, धनश्री जगताप, देवराम पिंजन, स्कूल व कॉलेजच्या प्राचार्य इनायत मुजावर, क्रीडा शिक्षक दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर शाळेत विद्यार्थी समिती गठित करण्यात आली असून या समितीवर लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. लहान वयातच मुलांना समता, सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये समजावीत तसेच त्यांना नेतृत्व व जबाबदारी कळावी, याकरीता मतदान पद्धतीने विद्यार्थ्यांची ही निवड करण्यात आली. मतदान पद्धतीचा हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल जगताप यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थी समितीवर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.