पिंपरी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या अल्पसंख्यांक सेलला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शहरातील ३० कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. पिंपरी येथील पक्ष कार्यालयात मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन विविध पदांवर कार्यकर्त्यांना नियुक्त करण्यात आले.
यामध्ये अख्तर शेख, इशरार मजीद शेख, मोहम्मद कलीम, मुर्तुजा चौधरी, शाहीद चौधरी, शहाबुद्दीन हलीम शेख, नफीस नसीम शेख, नजीर मयूर शेख, श्याम शेट्टी, सनी भाई शेख, मोईनुद्दीन शकील शेख, साजिद शेख, अब्बू शेख, अनिज मोईन शेख, अजुद्दीन शमदा शेख, इलियान शेख, नियाज शेख, अब्दुल रौफ रजाक शेख, फिरोज एम शेटा, असीम अहमद शेख, मुबीन हसन शेख, मोईनुद्दीन शेख, हबीब गफार शेख, मोहम्मद शेख, नजीर मोईन शेख, अनिल शेख, मोईन शेख, अब्दुल रजाक शेख, अलीम शेख, शेख अजमुद्दिन, शमशाद शेख, नसीम शेख, हसन अब्बास शेख आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांची अल्पसंख्याक सेलच्या विविध पदांवर शहराध्यक्ष तुषार कामठे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, माजी नगरसेवक गणेश मामा भोंडवे, विनायक रणसुभे, सागर चिंचवडे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष अल्ताफभाई शेख यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.