साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कावठे-साक्री यांच्या वतीने निजामपूर-जैताणे येथे शैक्षणिक वर्षातील आषाढी एकादशी निमित्ताने इ. नर्सरी ते इ.२ री. या विद्यार्थ्यांची”पंढरी वारी” काढण्यात आली. या रॅलीत शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल -रखुमाई च्या मूर्तींचे पूजन करून पांडुरंगाची आरती करण्यात आली. महाराष्ट्रातील थोर संताची व वारकऱ्यांची आणि विठ्ठल -रखुमाईची वेशभूषा साकारून टाळ, वीणा, मृदंग घेऊन “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ” हे भजन गात विद्यार्थ्यांनी परिसरातून दिंडी सोहळ्यास सुरवात केली. प्रत्यक्ष पंढरी वारीचे स्वरुप निजामपूर शहरात विद्यार्थ्यांनी उभे केले. या पंढरीच्या वारीने पंढरपूरच्या विठुरायाचे लोकांना दर्शन घडविले.
दिंडीचे निजामपूर शहरांमध्ये राणेनगर, जैताणे, बसस्थानक या परिसरात लोकांनी जोरात स्वागत केले. “विठ्ठल हरी जय हरी विठ्ठल ” राम कृष्ण हरी “या नामो उच्चाराने विद्यार्थी भजन गात, टाळ मृदंगाच्या संगे विठ्ठल रुखमाईचा जयघोष करत मंत्रमुग्ध झाले. ठिकठिकाणी विठ्ठलाचे भजन गीत गाऊन मोठ्या आनंद उत्साहात त्या ठिकाणी रॅलीद्वारे आषाढी एकादशीची जनजागृती लोकांमध्ये करण्यात आली. तसेच इ. 5 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम असे लेझीम नृत्य सादर केले. एक उत्कृष्ट असा आषाढी एकादशीचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे संबोधले जाते. एकादशी जुलै महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी मानली जाते.
या एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीची महायात्रा भरते. या यात्रेत संताची आणि भक्ताची खूप गर्दी असते. महाराष्ट्रातील हि संतांची परंपरा आणि संतांची संस्कृती ही भारतामधील आदर्श संस्कृती आहे, असे मत जितेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले. “जय हरी विठ्ठल… जय हरी विठ्ठल” या पांडुरंगाच्या गजरात कावठे भजनी मंडळाने कार्यक्रमात अधिक रंगत आणली. विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठल भगवंताचे सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी दर्शन घेऊन सर्वानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रफुल साळुंखे, सपना देवरे, पुनम पवार तसेच लेझीम नृत्याचे उत्कृष्ट नियोजन श्रावण अहिरे यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाची सजावट साळुंखे तर रांगोळी रेखाटन दीपमाला अहिरराव , सविता लाडे, किरण गवळी यांनी केली.