साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही हेडबाँय हेडगर्लसाठी गुरूवारी, ११ जुलै रोजी निवडणुक प्रक्रीया पार पडली. या निवडणुकीत स्कूलचा हेडबॉय विनीत देसले, तर अनुश्री बदामे हिची हेडगर्ल म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय संविधानाने दिलेल्या निवडणुक लढविण्याचा अधिकाराचा वापर करत प्रत्येक हाऊसच्या लीडरने जोरदार प्रचार केला. उमेदवारांनी मतदानाकरीता विद्यार्थ्यांच्या भेटी गाठी घेत यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली. या मतदानात ब्लू हाऊस, यलो हाऊस, ग्रीन हाऊस, रेड हाऊस या गटाची चुरशीची लढत झाली. या गटामध्ये ब्लु हाऊस मधून वेदीका बदामे व विनीत देवरे, ग्रीन हाऊसमधून अनुश्री बदामे व लोकेश भदाणे, रेड हाऊस – श्रेया कुवर, अजिस साळुंखे तर येलो हाऊसमधून निखिल देवरे, गायत्री पाटील यांनी निवडणूक लढविली. यात ब्लू हाऊस मधून विनीत देसले याने ३१४ मते आणि ग्रीन हाऊस मधून अनुश्री बदामे हिने २४२ मते मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला. विजयी विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले होते. पाटील यांनी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांनी शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. यामुळे यंदाचे मतदान विजयाचा आनंद द्विगुणित झाला.