प्रचिती पब्लिक स्कूलचा पालखी सोहळा उत्साहात; विठुरायाच्या नामस्मरणात शिरवाडे ग्रामस्थ झाले तल्लीन
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा शिरवाडे येथे जल्लोषात साजरा करण्यात आला.आषाढी शुद्ध एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा प्रचिती पब्लिक स्कूल’चे सर्व विद्यार्थी, प्राचार्या अनिता पाटील, व्यवस्थापक राहुल पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई च्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी विठ्ठलाच्या नामाचा गजराने सर्व परिसरात दुमदमून गेला. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील थोर संतांची, वारकऱ्यांची आणि विठ्ठल – रखुमाई यांची वेशभूषा साकारून टाळ मृदंगाच्या तालावर ‘विठ्ठल “नामाचा जयघोष करून दिंडीला सुरुवात केली. या दिंडी सोहळ्यात भजनी मंडळ सहभागी होते. सुंदर भजन गीतांनी परिसर भक्तिमय झाला. भजनाच्या तालावर विद्यार्थी व शिक्षक वृंदानी ठेका धरला. विठ्ठलाची आकर्षक अशी रांगोळी रिनल सोनवणे, सरिता मॅडम व तृप्ती मॅडम यांनी रेखाटली. सोहळ्यात शिरवाडे गाव भक्तिमय वातावरणात तल्लीन होवून गावात ठिकठिकाणी गावकरी व विद्यार्थ्यांनी फुगडी, लेझिम नृत्य सादर केले. विठ्ठलाचे भजन गीत गायन करून गावकऱ्यांनी वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण देवरे यांनी तर काजल मॅडम यांनी संयोजन केले. सुंदर फलक लेखनातून विठुरायाचे चित्रण रेखाटण्यात आले. महाप्रसादाने पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.