प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
साक्री :- येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांनी महर्षी व्यास व माता सरस्वती आणि आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाऊ या प्रतिमांचे पूजन केले. त्यानंतर “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः” या गुरूवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार असून शिक्षकांमुळे जीवनाला चांगली दिशा मिळत असते. शिक्षकामुळेच शिक्षणातील अज्ञात गोष्टींची जाणीव होत असून, गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच, प्राचीन काळापासून मानवी जीवनात गुरूंना खूप महत्त्वाचे स्थान आहे. गुरू हे आपल्या जीवनातील अज्ञानरुपी अंधार दूर करुन, ज्ञानरूपी प्रकाश देतात. भारतात आषाढ शुद्ध पक्षात महर्षी व्यास यांच्या जन्मदिनी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. म्हणून गुरुपौर्णिमेला “व्यासपौर्णिमा” असे म्हणतात. आपल्या जीवनात आई व वडिल हे पहिले गुरू मानले जातात. ते आपल्याला जन्म देतात. पालनपोषण करतात. परंतू आपला शारिरीक, मानसिक , बौध्दिक विकास हा केवळ गुरुमुळेच होतो. म्हणून आपल्या जीवनात गुरुला अधिक महत्त्व स्थान दिले जाते, असे मनोगत अंजली लाडे, स्नेहा साळवे यांनी व्यक्त केले.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इ.नर्सरी ते इ. ३ री.”रंगभरण स्पर्धा “व इ.४ थी. ते इ.९वीच्या विद्यार्थ्यांसाठी “चित्रकला स्पर्धा” या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धसाठी प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे बक्षीस देऊन व प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. या बक्षीसांचे व प्रमाणपत्राचे वितरण शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, शाळा व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे आणि वर्ग शिक्षक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष व शाळेच्या प्राचार्यां यांनी गुरुचे महत्व हे माणसाचे जीवनामध्ये किती आहे. याविषयी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन वैशाली खैरनार यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल पाटील यांनी केले. या कार्यक्रमात सुंदर अशी सजावट भूपेंद्र साळुंखे, किरण गवळी, दिपमाला अहिरराव यांनी केली होती. उत्कृष्टरित्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.