साक्री :– येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे “भारतीय असंतोषाचे जनक ” लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्या वैशाली लाडे, शाळा व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागत सत्कारानंतर विद्यार्थ्यांच्या भाषणाने कार्यक्रमाला सुरवात झाली. बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक या टोपण नावाने ओळखले जात होते. त्याचा जन्म २३जुलै १८५६ साली महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांनी १९८० साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत भारतीय मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी ते आग्रही होते. टिळक हे भारतीय लोकांच्या हक्काचे आणि कल्याणाचे कट्टर समर्थक होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या दडपशाही कायद्यापूढे उभे राहून अस्पृश्यता आणि बालविवाह यासारख्या सामाजिक समस्याविरुद्ध लढा दिला. समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, असे विचार लोकमान्य टिळक यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी मांडले.
सविता लाडे, रोहीणी आहिरराव यांनी मनोगत व्यक्त करतांना असे सांगितले की, टिळकांनी पत्रकार म्हणून देखील काम पाहिले. त्यांनी “केसरी” व “मराठा” हि वृतपत्र सुरू केली. आपल्या अग्रलेखातून इंग्रज सरकारवर सडकून टीका करत ग्रजांना देशातून हाकलून लावले पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. म्हणून लोकांना एकत्र कसे आणावे. या कल्पनेतून त्यांनी ” शिवजयंती” व “गणेशोत्सव” यासारखे कार्यक्रम व उत्सव सुरू केले. देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच” असे जळजळीत लेख वृतपत्रातून प्रसिद्ध होऊ लागले. इंग्रजांविरुद्ध कडा संघर्ष केला. आंदोलनाच्या माध्यमातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे लोकमान्य टिळक यांचे १९२० साली निधन झाले, असे मनोगत शिक्षकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी बोरसे, सुनिता पाटील यांनी केले. हेमांगी गवांदे, हिरल सोनवणे यांनी संयोजन केले. कार्यक्रमासाठी भूप्रेंद्र साळुंके, किरण गवळी, दिपमाला अहिरराव यांनी परिश्रम घेतले.