पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याध्यापिका अनिता पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि लोकमान्य टिळकांच्या प्रतिमा पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवनातील विविध पैलूंवर आधारित भाषणे, कविता आणि देशभक्तीपर गीते सादर केली. राहुल पाटील आणि अनिता पाटील यांनी टिळकांच्या राष्ट्रवादी चळवळीतील योगदान आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. अंशु कदम आणि आरव काकुस्ते यांनी टिळकांची वेशभूषा परिधान करून, त्यांच्या प्रसिद्ध संभाषणांचे सारांश देऊन उपस्थितांना मनोरंजन केले.
विद्यार्थ्यांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या टिळकांच्या प्रसिद्ध घोषणेचा जयजयकार करत उत्साह व्यक्त केला. शितल वाघ यांनी उत्साहाने आणि कुशलतेने कार्यक्रमाचे संयोजन केले. लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रम देशभक्ती आणि राष्ट्रीय भावनेने भरलेला उत्सव होता. विद्यार्थ्यांनी टिळकांच्या विचारांना आणि कार्याला श्रद्धांजली अर्पण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. कार्यक्रमासाठी फलकलेखन माधुरी व जागृती मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली वाघ यांनी केले. सुनिता जाधव यांनी आभार मानले. यावेळी, सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.